अफगाणिस्तानमध्ये भीषण स्फोट; 8 जणांचा जागीच मृत्यू, 47 जखमी

अफगाणिस्तानमध्ये एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 47 जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानच्या पश्चिम भागातील हेरात प्रांतात एक स्फोट झाला, त्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक लहान मुलाचा समावेश आहे. तसेच 47 जण जखमी झाले असून त्यात 11 सैनिकांचा समावेश आहे. या स्फोटात 14 घरांचे नुकसान झाले आहे.

हा स्फोट कोणी केला हे अजून कळालेले नाही. कुठल्याही संघटनेने या स्फोटाची जवाबदारी स्विकारलेली नाही. तालिबान आणि सरकारमध्ये शांतीवार्ता सुरू असून अशा प्रकारे सामान्य नागरिकांना लक्ष्य करणे धोक्याची घंटा असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

You May Also Like