अबब! रस्त्याच्याकडेला पोत्यामध्ये होते एक कोटी रुपये, लोकांनी पाहून पोलिसांना बोलावलं आणि..

रस्त्यावरच्या कडेला एक पोते पडले होते. ही पोती नोटांनी भरलेली होती. भर रस्त्यामध्ये एवढ्या नोटा पाहिल्यानंतर नागरिकही थक्क झाले. एक नोटांनी भरलेली पोती पडलेली असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी जेव्हा पोते उघडले तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सगळ्यात विशेष म्हणजे हे ऐवढे पैसे मोजता मोजता सगळ्यांनाच घाम फुटला.

हे प्रकरण तमिळनाडूच्या तिरुचिराप्पल्ली  जिल्ह्यातील आहे. रस्त्याच्या कडेला एक पोतं पडलं आहे, यामध्ये काहीही गंभीर आणि धोकादायक गोष्ट असून शकते अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. पण घटनास्थळी जाऊन पोतं उघडताच सगळे हादरले. खरंतर, तमिळनाडूमध्ये सध्या निवडणुका होणार आहेत.

विधानसभा निवडणुका 6 एप्रिल रोजी  होणार आहेत. त्यामुळेच निवडणूक अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. नोटांची पोती जप्त केली. आता हे ऐवढे पैसे नेमके कोणाचे आहेत आणि भर रस्त्यामध्ये कोणी फेकले याचा पोलीस शोध घेत असून ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा कोणाचा डाव आहे का? याबद्दल पोलीस सध्या शोध घेत आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!