अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले- तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील विदगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील विदगाव येथील १६वर्षीय मुलगी रविवारी १४ मार्च रोजी दुपारी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने राहत्या घरातून फुस लावून पळवून नेले. सायंकाळी अल्पवयीन मुलीचे नातेवाईक घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय चौधरी करीत आहे.

You May Also Like