अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी बाळ बोठेला हैद्राबाद येथे अटक

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य संशयीत सुत्रधार व पत्रकार बाळ बोठे यास हैद्राबाद येथून अटक करण्यात आली आहे. अहमदनगर पोलिसांच्या पथकाने अखेर त्याला आज शनीवारी पहाटे हैद्राबाद येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. गेल्या साडेतीन महिन्यापासून बाळ बोठे फरार होता. रेखा जरे यांच्या मारेक-यांपैकी यापुर्वी पाच संशयीत आरोपींना यापुर्वी अटक केली आहे.

You May Also Like