आग्रीपाडा येथे इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही

आग्रीपाडा येथील ‘म्हाडा’च्या धोकादायक सिराज मंजील इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

मोरलॅड रोड, परेभीया हॉटेलजवळ ही ‘म्हाडा’ची तळमजला अधिक पाचमजली धोकादायक इमारत आहे. ‘म्हाडा’ने ही इमारत सी – 1 म्हणून धोकादायक जाहीर केली आहे. त्यामुळे या इमारतीत सध्या कोणीही राहत नाही. त्यामुळे दुर्घटना घडली तेव्हा सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

You May Also Like