आधी पाच लाख जमा करा तरच याचिकेवर सुनावणी, हायकोर्टाने भाजप आमदार आशीष शेलार यांना बजावले

कोविड काळात पालिकेने औषधांसाठी तसेच जंतुनाशकांसाठी वाढीव दराने निविदा मागवल्या असून यात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेणाऱ्या भाजप आमदार आशीष शेलार यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर घेतले. आधी पाच लाख कोर्टात जमा करा तरच याचिकेवर सुनावणी घेऊ, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने शेलार यांना बजावले.

पालिकेने औषध तसेच जंतुनाशकांसाठी 21 ऑगस्ट 2020 साली टेंडर काढले होते. या निविदा काढताना पालिकेने जागतिक आरोग्य संघटना तसेच पेंद्र सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही तसेच जंतुनाशकांचा दर्जाही राखला गेला नसल्याचा आरोप करत आमदार आशीष शेलार यांनी अॅड. दीपा चव्हाण यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली असून या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश पुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. पालिकेची निविदा प्रक्रिया ही नियमाप्रमाणे युक्तिवाद मुंबई महापालिकेमार्फत आज करण्यात आला.

You May Also Like