आमच्यावर हल्ले करण्यास अमेरिका इतर देशांना भडकावतोय! उच्चस्तरीय बैठकीत चीनचा आरोप

अलास्कामध्ये चीन आणि अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये जबरदस्त खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली आहे. या बातमीत म्हटलंय की सार्वजनिक मंचावर दोन शक्तिशाली देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये अशा पद्धतीची खडाजंगी होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. चीनने अमेरिकेवर आरोप केला आहे की तो अन्य देशांना चीनवर हल्ला करण्यासाठी भडकावत आहे. चीनच्या या आरोपांना इन्कार करताना अमेरिकेने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय.

You May Also Like