आरबीआयने देशातील सर्वात मोठ्या बँकेला ठोठावला कोटींचा दंड, जाणून घ्या कारण….

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ला  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 16 मार्चला प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, एसबीआयने काही नियमांचे पालन केले नाही, त्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. 15 मार्चला आदेश जारी करून आरबीआयने हा दंड आकारला आहे. 

आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. केंद्रीय बँकेच्या प्रसिद्धीपत्रानुसार, बँक नियमन कायद्यातील काही तरतुदींचं उल्लंघन केल्यामुळे आणि कमिशनच्या रूपाने बँक कर्मचार्‍यांना मोबदला देण्याबाबत सुचवलेल्या सूचनांसाठी दंड आकारण्यात आला आहे.

आरबीआयने सांगितले की, ही कारवाई नियामक अनुपायाच्या अभावाशी संबंधित आहे. एसबीआयने आर्थिक स्थितीच्या संदर्भात 31 मार्च 2017 आणि 31 मार्च 2018 रोजीही माहिती दिली होती. हा जोखीम मूल्यांकन अहवालाशी संबंधित होता. हा दंड का आकारला जाऊ नये आणि त्याच वेळी कर्मचार्‍यांना भरपाई देय देण्याचे स्पष्टीकरणही आरबीआयने दिले होते.दरम्यान, आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन कलम 1949 चे कलम 10 (1) (बी) (ii) चे उल्लंघन आणि कमिशन म्हणून कर्मचार्‍यांना मोबदला न दिल्यामुळे एसबीआयवर 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

You May Also Like