कासोदा -: वसीम रिजवीला अटक करा व कारवाई करा ; मौलाना आझाद विचार मंचची मागणी

कासोदा ता. एरंडोल येथील मौलाना आझाद विचार मंचच्यावतीने वसीम रिजवीला अटक करा व कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.
इस्लाम मेसेज ऑफ पीस इस्लाम शांतीच्या संदेश देणार आहे. कुरानशरीफच्या तत्वावर चालणारा हा धर्म आहे. कुरान शरीफ शांती सद् भावनाचा प्रतीक असून वासना तसेच संसारात सर्व वाईट गोष्टीला विरोध करणारा धर्म आहे. अशा कुरान शरीफ मधील २६ सुर् हे काढण्याची माँग उत्तर प्रदेश येथील लखनऊ शहरचे शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुरान मधला कोणताही शब्द बदलता येत नाही. यापूर्वीही त्याने असे अनेक किस्से केले आहे. त्याच्या फक्त हिंदू मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करणे व कायम प्रसिद्धीमध्ये राहणे हेच आहे. या कारणाने सर्व शिया समाजाने त्याचा तीव्र विरोध केला आहे. त्याच्या भाऊ-बहीण आई व पत्नी यांनी पण त्यांच्याशी नाते तोडले आहे. तरी अशा समाज कंटकला अटक करा व कारवाई करा अशी मागणी मौलाना आझाद विचार मंचतर्फे कासोदा पोलीस स्टेशनला एपीआय रवींद्र जाधव साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी नूरुद्दीन मुल्लाजी, आरिफ पेंटर, सलाउद्दीन अल्लाउद्दीन शेख, हमजे खान, रजा केबलचे मुश्ताक भाई, जाकीर खान, मुश्ताक शायर, मुजाहिद खान, मंसूर खान, गालीब मिर्झा शेख जहूर आदी उपस्थित होते.

You May Also Like