कुरंगी येथे जाब विचारल्याने वाळु माफीयांनी केली तरुणास मारहाण

पाचोरा तालुक्यात अवैध वाळु वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना जाब विचारल्याने तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, तरुणाने पाचोरा पोलीसात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दि. २५ रोजी सायंकाळी कुरंगी परिसरातील गिरणा नदी पात्रात सुमारे ५० ते १०० जण अवैध वाळुची चोरी करत असतांना कुरंगी येथील गणेश संतोष पाटील हे संबंधीतांना जाब विचारायला गेले असता जाब विचारण्याचा राग आल्याने सुधीर शरद पाटील, सागर अशोक पाटील, संजय डिगंबर पाटील, मंगेश पाथरवट, समाधान युवराज पाटील, ज्ञानेश्वर पाथरवट, महेश राजेंद्र बोरसे, मुकेश पाटील सह अनोळखी ४ ते ५ जणांनी गणेश पाटील यांना बेदम मारहाण केली. याबाबत संबंधितांवर गणेश पाटील यांनी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शामकांत पाटील हे करीत आहे.

You May Also Like

error: Content is protected !!