कोरोनाने पुन्हा वाढवले टेन्शन ! 24 तासात सापडल्या 35 हजारपेक्षा जास्त केस, 171 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसत आहेत. कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दररोज रेकॉर्ड करत आहे. देशात मागील 24 तासांच्या आत 35 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार, कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात एकुण संक्रमितांची संख्या 1 कोटी 14 लाख 74 हजार 605 झाली आहे. मागील 24 तासात कोरोना व्हायरस संसर्गाची 35,871 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 171 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 63 हजार 25 लोक रिकव्हर झाले आहेत, तर सध्या 2 लाख 52 हजार 364 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर देशात एकुण मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 59 हजार 216 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 10,63,379 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

महाराष्ट्रात 23,179 नवी प्रकरणे
महाराष्ट्रात बुधवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 23,179 नवी प्रकरणे समोर आली जी 2021 मध्ये एका दिवसात नोंदलेली सर्वात जास्त प्रकरणे आहेत. आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की नवीन प्रकरणांसह राज्यात आता एकुण प्रकरणांची संख्या वाढून 23,70,507 झाली आहे. बुधवारी या महामारीने आणखी 84 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून 53,080 झाली आहे. आरोग्य विभागानुसार, एक दिवसात 9,138 लोकांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, ज्यानंतर बरे झालेल्या लोकांची एकुण संख्या वाढून 21,63,391 झाली आहे. राज्यात सध्या 1,52,760 रूग्ण उपचाराधीन आहेत.

You May Also Like