‘क्रॉस व्हॅक्‍सिनेशन’ होऊ देऊ नका; लसीकरण केंद्रांना आयुष प्रसाद यांच्या सूचना

पुणे – लसीकरण केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस दिला, त्याच कंपनीचा लसीचा दुसरा डोस द्यावा. लसीमध्ये क्रॉस व्हॅक्‍सिनेशन होणार नाही याची खबरदारी घ्या, असा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत.

राज्यात 16 जानेवारीपासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरवात झाली. त्यामध्ये कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्‍सीन अशा दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे डोस दिले जात आहे. पहिला डोस घेतल्यावर 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यायचा आहे.

त्यानुसार जानेवारी महिन्यांत घेतलेल्या लसीच्या लाभार्थ्यांचा दुसरा डोस झाला. मात्र, फेब्रुवारी महिन्यांत घेतलेल्या लसीच्या पहिल्या लाभार्थ्यांची दुसरा डोस आता घेतला जात आहे.

टप्प्याटप्प्याने हे लसीकरण होत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्‍टर, कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर यांना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षापेक्षा अधिक तसेच 45 ते 60 या वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात आहे.

You May Also Like