गळ्यात स्टीलचे पट्टे बांधून बनवले होते गुलाम, पोलिसांच्या छापेमारीत 6 महिलांची सुटका!

मुंबई : एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात सहा महिलांना ‘लैंगिक गुलाम’  म्हणून ठेवले होते. पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे. या युवकाने सैन्यात काम केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स येथे घडली आहे

फेडरल पोलिसांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागातील जेम्स रॉबर्ट डेव्हिसच्या घरी छापा टाकला. पोलिसांना घराच्या अनेक संशयास्पद वस्तू मोठ्या भागात पसरलेल्या आढळल्या. तपासणीनंतर पोलिसांनी डेव्हिसवर ‘महिलांना गुलाम’ केल्याचा आरोप दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी युवकाने स्वत:ला ‘हाऊस ऑफ कॅडिफर्स’चा प्रमुख म्हणून वर्णन केले आहे. एका पीडित महिलेने ऑस्ट्रेलियाच्या एबीसी न्यूजला सांगितले की, डेव्हिसने तिच्या गळ्यात स्टेनलेस स्टीलचा पट्टा बांधून ठेवला होता आणि तिला धातुच्या एका पिंजऱ्यात बंद केले होते.

पोलिसांना लागले तब्बल 15 तास!

ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी जेम्स रॉबर्ट डेव्हिसच्या घराचे फोटोही जाहीर केले आहेत. डेव्हिसची संपत्ती मोठ्या भागात पसरलेली आहे. यावर छापा टाकण्यास पोलिसांना सुमारे 15 तासांचा कालावधी लागला. Abc.net.au च्या अहवालानुसार डेव्हिसने या भागात बऱ्याच लहान-लहान लाकडी झोपड्या बनवल्या होत्या. या झोपड्या मुख्य घरापासून शंभर मीटर अंतरावर होत्या. त्यामध्ये एक-एक बेड बसवण्यात आले होते. छापेमारी दरम्यान पोलिसांना असे चार बॉक्स सापडले, ज्यावर महिलांची नावे कोरलेली होती. पोलिसांना घराबाहेर सेक्ससंबंधित अनेक वस्तूही सापडल्या.

ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलात केले होते काम!

विशेष म्हणजे डेव्हिसने सुमारे 17 वर्षे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलात काम केले आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार डेव्हिसवर 2012 ते 2017 दरम्यान या महिलांना गुलाम केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडित महिलांची दिशाभूल केली आणि त्यांच्यावर शारीरिक, मानसिक व लैंगिक अत्याचार केले

महिलांना दिली होती जीवे मारण्याची धमकी

या महिलांकडून सेक्स वर्कही करून घेण्यात येत होते आणि हे काम डेव्हिसच्या देखरेखीखाली करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या महिलांना लैंगिक कामाच्या बदल्यात पैसे दिले गेले नाहीत. पोलिसांनी सांगितले की, ज्या महिलांनी तिथून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, डेव्हिसने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. पुरावे म्हणून पोलिसांनी अनेक फोन, कॅमेरे आणि संगणक जप्त केले आहेत.

डेव्हिसने या गुलाम बनवलेल्या महिलांशी करार केला होता. या करारांमध्ये असे म्हणण्यात आले होते की, महिला त्यांच्या स्वत:च्या इच्छेनुसार डेव्हिसकडे आत्मसमर्पण करत आहेत.

डेव्हिसवर लागणार आणखी चार्ज!

औपचारिकपणे फक्त एका पीडितेचे शोषण केल्याचा आरोप डेव्हिसवर ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, आता आणखी काही चार्ज लावले जाऊ शकतात. त्याच वेळी, 2018 मध्ये डेव्हिसने ‘कॅडिफरः अ स्टोरी अबाऊट लव्ह, फॅमिली अँड स्लेव्हरी’ नावाच्या टीव्ही शोमध्ये भाग घेतला. यापूर्वी डेव्हिस स्वत:चे वर्णन रोप परफॉर्मर, फेटिश फोटोग्राफर, बीडीएसएम लेखक, किंक एज्युकेटर आणि कन्सेंट अ‍ॅडव्होकेट म्हणून करायचा.

You May Also Like

error: Content is protected !!