गिरीश महाजन याना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागणार ही तर सुरवात- ऍड विजय भास्करराव पाटील

जळगावच्या जनतेने पाच वर्षांसाठी महापालिकेत भाजपाला सत्ता दिल्यानंतर केवळ अडीच वर्षातच भाजपची सत्ता गेल्याने आता गिरीश महाजन यांना कसे वाटत असेल असा विचार आमच्या मनात येत असल्याची प्रतिक्रिया ऍड विजय भास्करराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. ज्याप्रमाणे गिरीश महाजन मंत्री असताना त्यांना सत्तेचा माज या असल्याने जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सन 2015 ते 2020 या कालावधीसाठी आमचे संचालक मंडळ कायदेशीर निवडून आलेले असताना सत्तेचा माज असलेल्या महाजन यांनी आमच्या संस्थेत कै. नरेंद्र अण्णा पाटील यांच्या विचारांचे संचालक मंडळ असल्याने त्यांना त्या ठिकाणी घोडे बाजार येत नव्हता त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या मदतीने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला संस्थेतुन बाहेर काढले होते. परंतु काळाने त्यांनी केलेल्या कर्माच फळ त्यांना दिल असून त्यांना महापालिकेच्या बाहेर काढून फेकले आहे त्यामुळे काळाने आज त्यांची मस्ती जिरवली आहे. त्यांनी केलेल्या कर्माची फळे त्यांना वेळोवेळी भोगावी लागणार आहे हे महाराष्ट्र बघेलच आज पुन्हा एकदा काळ हा नेहमी सर्वश्रेष्ठ असतो हे आज सिद्ध झाले आहे.

You May Also Like