गुजरातमध्ये प्लॅस्टिक फॅक्ट्रीला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

गुजरातमधील प्लास्टिक कारखान्यात शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. अहमदाबादच्या वटवा येथे असलेल्या प्लॅस्टिकच्या कारखान्याला आग लागली आहे. आगीचं रुप इतकं रौद्र होतं की सर्वत्र धूर पसरला होता. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार आग वटवा जीआयडीसी फेज ४ मध्ये लागली होती. जीआयडीसी फेज ४ मधील मारुंधर प्लॅस्टिक पॅकेजिंगमध्ये बॉयलर फुटल्यामुळे, रासायनिकांमुळे आग सर्वत्र पसरली. लोकांच्या सुरक्षेसाठी आजूबाजूचे परिसर रिकामे करण्यात आले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं समोर आलं आहे.

जीआयडीसीतील आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे. यासाठी ३६ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. दरम्यान, आगीने एक भयानक रूप धारण केलं होतं. मारुंधर प्लॅस्टिक पॅकेजिंगमध्ये बॉयलर फुटल्याने भीषण आग लागली होती. सुरक्षेसाठी जवळपासच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले होते

You May Also Like