गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची नवी कल्पना

चोरांची गुन्हेगारी वृत्ती थांबवून चोरी रोखण्यासाठी अनेक देशांतील पोलिस खाते वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत असतात. चोरीच्या आरोपात झालेल्या तुरुंगवासातून बाहेर पडल्यानंतरही काही चोर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या मार्गावर अटळ असतात. यासगळ्यात चोरांच्या या दरोडेखोरीला आळा घालण्यासाठी ब्रिटनमधील पोलिसांनी एक नवीन तर्क लावला आहे. जगात पहिल्यांदाच दरोडेखोर आणि चोरांना ट्रॅक करण्यासाठी जीपीएसचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे चोरांवर पारख ठेवणं सोपे होणार आहे. चोरीमुळे होणाऱ्या घटना रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये ही नवीन पद्धत अवलंबण्यात आली आहे.
पोलिसांना चोरांवर चोवीस तास नजर ठेवता यावी यासाठी ही भन्नाट कल्पना करण्यात आली आहे.

न्यायिक मंत्रालयाच्या म्हण्यानुसार, ही योजना चोरीच्या घटनांवर निर्बंध आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेनुसार चोरीच्या प्रकरणात तुरुंगातून शिक्षा पूर्ण केलेल्यांच्या पायामध्ये जीपीएस टॅग लावण्यात येणार आहे. यानंतर हे जीपीएस मुख्य सर्व्हरला जोडण्यात येईल. ही पद्धत खूपच फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहा पोलीस क्षेत्रांमध्ये जीपीएस टॅगचा प्रायोगिक तत्वावर वापर होईल. यामध्ये एवन, चेशायर, ग्लॉस्टरशायर, ग्वेंट, हंबसाईड आणि वेस्ट मिडलॅंड्स यांचा समावेश असणार आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या योजनेला यश आल्यास अन्य क्षेत्रातही अशी योजना सुरु करण्यात येईल. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अनेकजण पुन्हा एकदा गुन्हेगारीकडे वळतात. जवळपास ८० टक्के प्रकरणांत संशयित आरोपींची ओळख पटवता येत नाही. ही जीपीएसची पद्धत चोर आणि दरोडेखोरांच्या अटकेसाठी एक अतिरिक्त पद्धत असणार आहे.

You May Also Like

error: Content is protected !!