जबरीने मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीच्या म्होरक्याच्या शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव शहरातील विविध परिसरात नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा म्होरक्या रईस खान हनीफ खान ऊर्फ रईस लाला (वय २७) रा. मास्टर कॉलनी याच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. त्याला गेंदालाल मिल परिसरातून पाठलाग करून अटक केली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात पायी रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातुन जबरीने मोबाईल हिसकावण्याच्या गुन्ह्यामध्ये अधिक वाढ झाल्याने यावर आळा घालण्यासाठी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय मुंडे यांनी डीबी पथकाचे एक पथक तयार करून मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले होते. शहर पोलीसांच्या पथकातील पोलिस नाईक अक्रम शेख, पोलीस नाईक भास्कर ठाकरे, पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे, पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांनी गेंदालाल मिल परिसरात आज 23 मार्च रोजी सापळा रचून संशयित आरोपी रईस खान आणि खान उर्फ रईस लाला याचा पाठलाग करून अटक केली आहे. संशयित आरोपीने शहरात गेल्या जबरी मोबाईल हिसकावणेच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. संशयित आरोपी हात गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता त्याच्याकडून शहरातील जबरी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.

You May Also Like

error: Content is protected !!