जळगावात पोलिसांनी जप्त केलेल्या 176 वाहनांचा लिलाव

जळगाव पोलिसांकडून विविध गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या 176 वाहनांचा लिलाव आज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात करण्यात आला. जळगाव येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, शनीपेठ पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, रामानंद नगर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन येथे विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली वाहने बऱ्याच दिवसांपासुन पोलीस ठाण्यात पडुन होत्या.

सदर वाहनांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला प्रसिध्द करण्यात येऊन गाडीची मुळ कागदपत्रे, ओळखपत्रे व मालकी हक्काचा पुरावा सादर करुन सदर वाहने घेवुन जाण्याचे आवाहन पाचही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र मुदतीत वाहनांची ओळख पटवुन न नेल्याने सदर वाहनांचा लिलाव आज करण्यात आला आहे. या वेळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, तसेच जळगाव येथील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

 

You May Also Like