जळगाव -: अट्टल घरफोडी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

जळगाव : भुसावळ शहरात घरफोड्या करणारा अट्ट्ल गुन्हेगार चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना यश आले आहे. शेख जहीर असे अटक केल्येल्या चोराचे नाव असून जहीर यास पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातुन अटक केली आहे.
लॉकडाऊन कालावधीत भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याचे त्याने कबुल केले आहे. त्याच्याकडून 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक व मणी तसेच 2500 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील कारवाईकामी त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, सहायक फौजदार शरीफ काझी, पो. ना. युनूस शेख, पो. ना. किशोर राठोड, पो. का. विनोद पाटील, पो. कॉ. रणजीत जाधव, चा.पो.कॉ. अशोक पाटील, चा. पो.कॉ. मुरलीधर बारी यांनी ही महत्वाची कामगिरी केली आहे.

You May Also Like