जळगाव गृहमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन ! भाजपचे जळगावात आंदोलन

जळगाव : १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज जळगावातील टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी गृहमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. आंदोलकांनी गृहमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात आमदार राजूमामा भोळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, माजी महापौर भारती सोनवणे, नगरसेविका शुचिता हाडा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

You May Also Like