जळगाव : चोरट्यांची कमाल घराच्या गच्चीवर फोनवर बोलत असलेल्या तरुणाच्या समोर त्याची दुचाकी लांबवली- जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव शहरातील निवृत्ती नगर येथे राहणारा तरुण हा आपल्या घराच्या गच्चीवर फोनवर बोलत असतांना खाली लावलेली दुचाकी त्याच्या डोळ्यादेखत चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली असून दोघा चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,
शहरातील निवृत्ती नगरात निलेश दत्तात्रय पाटील वय ३१ हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे.त्याच्याकडे एम.एच.१९ बी.ई.८९५० या क्रमांकाची दुचाकी असून त्याने ती नेहमीप्रमाणे आपल्या अंगणात लावली होती. काल मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निलेश हा घराच्या गच्चीवर फोनवर बोलत असतांना दोन जण तीथे आले आणि त्यांनी तिथे उभी असलेली नीलेशची दुचाकी सुरु केली. सुरवातीला निलेशला वाटले की मित्र गाडी घेऊन जात आहेत मात्र नीट बघितल्यावर कोणीतरी दुसरेच आपली दुचाकी घेवून जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. लागलीच निलेशने आरडाओरडा करायला सुरुवात केली मात्र चोरट्यांनी दुचाकी घेऊन ताबळतोब तेथून पळ काढला निलेशने त्या चोरट्यांचा बजरंग बोगद्यापर्यंत पाठलाग सुद्धा केला मात्र ते मिळून आले नाही. निलेश पाटील याच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्‍वर सपकाळे हे करीत आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!