जळगाव जिल्ह्यात आढळले ८४३ कोरोनाबाधित, ७४० झाले बरे

जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८४३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ७४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – ९९, जळगाव ग्रामीण-२५, भुसावळ- ८९, अमळनेर-९४, चोपडा-१०७, पाचोरा-७९, भडगाव-०३, धरणगाव-२६, यावल-२०, एरंडोल-२८, जामनेर-६२, रावेर-५१, पारोळा-१४, चाळीसगाव-६२, मुक्ताईनगर-६३, बोदवड-४२, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण ८४३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३१ हजार ५५४ पर्यंत पोहचली असून ११९ हजार ३०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २३६३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९९०३ रुग्ण सध्या उपचार घेताय.

You May Also Like