जळगाव -: बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; तालुका पोलीसात नोंद

जळगाव तालुक्यातील सुजदे शिवारात बैलाच्या हल्ल्यात बाळू श्रावण न्हावी (वय-५०) रा. आसोदा ता. जि.जळगाव या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजेच्यापूर्वी घडली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांना दिलेल्या जबाबानुसार, तालुक्यातील सुजदे शिवारात लक्ष्मण सोनवणे यांचे शेत आहे. शेतात त्यांची बैलजोडी बांधलेली होती. गुरूवारी सकाळी बाळू न्हावी हा मद्याच्या नशेत बैलांजवळ आला. त्यावेळी एका बैलाने त्याच्यावर हल्ला चढविला. त्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, अतिरिक्तस्त्रावामुळे बाळू याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार गावातील नागरिकांना कळताच, त्यांनी पोलीस पाटील अशोक सोनवणे यांना कळविले. त्यांनी घटनास्थळी जावून पाहिल्यावर बाळू न्हावी हा मयत स्थितीत आढळून आला. पोलिसांना बोलवून पंचनामा झाल्यानंतर मृतदेह रूग्णालयात नेण्यात आला होता. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बैलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस पाटीलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

You May Also Like