जळगाव -: भाजपला पुन्हा मोठा धक्का माजी महापौर ललीत कोल्हे देखील शिवसेनेच्या संपर्कात.

जळगाव -: भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा ताजी असताना यात माजी महापौर ललित कोल्हे हे देखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता महापालिकेत सत्तांतर 100 टक्के होणार असल्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान माजी महापौर ललीत कोल्हे यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला धक्का दिला आहे
ललीत कोल्हे हे जळगावच्या राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. आता ते स्वत: शिवसेनेला जाऊन मिळाल्याने भाजपला मोठा धक्का तर बसणारच आहे, पण शिवसेनेला याचा लाभ होण्याची शक्यता आहे. तर कोल्हे यांचे समर्थक नगरसेवक देखील हाच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. अर्थात, यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

You May Also Like