जळगाव महापौर उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन होणार; खंडपीठाचा निर्णय

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदांसाठी येणारी निवड प्रक्रिया ऑफलाईन होण्यासाठी दोन नगरसेवकांनी दाखल केली होती ही याचिका खंडपीठाने फेटाळून लावली असून आता महापौर आणि उपमहापौर यांची निवड प्रक्रिया ऑनलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवड १८ मार्च रोजी होत असून याआधीच भाजपमध्ये फूट पडलेली आहे. दरम्यान, ही निवड प्रक्रिया ऑनलाईन या प्रकारात होत असल्याने भाजपने याला विरोध दर्शविला होता. या अनुषंगाने डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.

खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुळकर्णी यांनी डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी दाखल केलेली याची फेटाळून लावली असून महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

You May Also Like