जळगाव : रमजान ईद व अक्षयतृतीया या सणानिमित्त 12 मे ते 14 मे पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार- जिल्हाधिकारी

जळगाव : रमजान ईद व अक्षयतृतीया या सणानिमित्त 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रमजान ईद व अक्षयतृतीया या आठवड्यात असल्याने या सणानिमित्त 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत या कालावधीत सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, अंडी/चिकन/मटन/मासे ड्रायफ्रुटस दुकाने, विक्रीची दुकाने, बेकरी, दुध विक्री केंद्रे सुरु राहतील. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

याचबरोबर नागरिक व दुकानदारांनी सोशल डिस्टनसिंग चा वापर करून कोविड-19 नियमावलीचे पालन करावे.
एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांनी आपल्या प्रभागातील/वार्डातील दुकानातून खरेदी करावी. शक्यतो होम डिलिव्हरीस प्राधान्य देण्यात यावे व खरेदीसाठी जातांना नागरिकांनी शक्यतो वाहनाचा वापर टाळावा. दुकान मालक/चालक यांनी दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये. तसेच दुकानासमोर गर्दी होऊ नये याकरीता दुकानासमोर वर्तुळ तयार करुन नागरिकांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याबाबत सूचित करावे. या आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.

You May Also Like