जळगाव -: हरिविठ्ठल नगरात विष घेतलेल्या त्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव । विषारी औषध प्राशन केल्याने उपचार सुरु असतांना हरिविठ्ठल नगरातील ४६ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील हरिविठ्ठल नगरातील रहिवासी सोहमलाल गणेश रायपुरे (वय ४६) यांनी १४ मार्च रोजी यांनी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यानयाठिकाणी उपचार सुरु असतांना सोमवारी १५ मार्च रोजी सव्वातीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे सीएमओ डॉ. मिलींद बारी यांच्या खबरीवरुन रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना प्रवीण जगदाळे, विनोद सुर्यवंशी हे करीत आहे.

You May Also Like