जळगाव : 11 मे 2021 पानटपरी फोडणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या

जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉप परिसरात बंद पान टपरी फोडणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. भरत संजय सपकाळे वय 21 रा. समतानगर धामणगाव वाडा जळगाव, शाम सोपान कळसकर अशी या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून एक एलईडी टीव्ही जप्त करण्यात आला असून दोघांना पुढील तपासकामी तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव शहरात घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक फौजदार अशोक महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल दादाभाऊ पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल जयंत चौधरी, पोलीस नाईक नंदलाल पाटील, पोलीस नाईक किरण धनगर, पोलीस नाईक प्रमोद लाडवंजारी,पो. कॉ. भगवान पाटील पो.कॉ. सचिन महाजन चालक पो.ना. अशोक पाटील यांचे पथक स्थापन केले होते. 10 एप्रिल 2021 रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली की जळगाव शहरातील समता नगर भागात राहणाऱ्या भरत संजय सपकाळे हा घरफोडी सारखे गुन्हे करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरील पथकाने समतानगर येथे जाऊन सापळा लावून भरत संजय सपकाळे वय 21 वर्षे रा. समता नगर धामणगाव वाडा जळगाव यास ताब्यात घेतले असता त्याने कबुली दिली की, सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी मी व माझा मित्र शाम सोपान कळसकर वय 21 रा. समता नगर धामणगाव वाडा आम्ही दोघांनी खोटे नगर रिक्षा स्टॉप जवळ एक बंद पान टपरी चा ताळा तोडून आत प्रवेश करीत टपरीतील एक ओनिडा कंपनीची एलईडी चोवीस इंची टीव्ही, व रोख रुपये चोरून नेले होते. तसेच त्या परिसरातील आणखीन दोन टपऱ्यांचे टाळे तोडून रोख रुपये चोरी केली देखील कबुली दिली.त्यांच्याकडून ओनीडा कम्पणीचा 24 इंची एलईडी टीव्ही जप्त करण्यात आला आहे. दोघांची अधिक चौकशी केली असता तालुका पोलीस ठाण्यात गु.र.न.143/ 2019 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. अधिक तपासकामी दोघांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

You May Also Like