जळगाव ; May 10,2021 पत्रकार बाधंवाना स्वतंत्र लसीकरण- आ राजु मामा भोळे यांच्या मागणीला यश

जळगाव : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बाधंव गेल्या दिड वर्षा पासून कोरोना महामारीच्या काळातही आपल्या जिवांची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असुन म्हणुच पत्रकार बाधंवाना स्वतंत्र लसीकरण करण्यासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजु मामा) यांनी दिनांक 29 एप्रिल रोजी मा.जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा शल्य चिकित्सक” यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. सर्व पत्रकार प्रिंट मीडिया व ई-मीडिया प्रतिनिधींना लसीकरणात प्राधान्य देण्यात यावे अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती त्यानुसार आज रोजी दिनांक ०९-०५-२०२१ रोजी श्री चेतन दास मेहता हॉस्पिटल येथे सर्व पत्रकार बांधवांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून आ सुरेश भोळे राजूमामा यांनी पत्रकार बाधंवानसाठी स्वतंत्र केलेल्या मागणीला यश मिळाल्याने पत्रकार बाधंवानी त्यांचे आभार व्यक्त केले आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

You May Also Like