जळगाव : May 9, 2021 वरणगाव येथे 100 खाटांचे अद्यावत कोविड केअर सेंटर सुरू होणार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

जळगाव : वरणगाव येथे शिवभोजन केंद्राला भेट देण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील वरणगाव येथे आले असता येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांनी कोविड केअर सेंटरचे मागणी लावून धरले प्रसंगी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर हे देखील उपस्थित होते केअर सेंटर बाबत चंद्रकांत बडे सर व सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर विश्वस्त मंडळाचे काही विश्वस्त उपस्थित होते प्रसंगी विश्वस्त मंडळाने त्यांचे लोक कल्याण रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले व तशा आशयाचे पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद व प्रशासन नगरपरिषद यांना दिले सदर कबीर केअर सेंटर सुरू व्हावे यासाठी आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,प्रांताधिकारी भुसावळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्वरित कोविड केअर सेंटर सुरू करण्याची विनंती केली व ती मान्य झाली असून सदर बाबतीत जिल्हा निबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याशी देखील आमदार पाटील यांनी चर्चा करून रुग्णालयाची इमारत त्वरित खाली करून देणेबाबत सूचना केल्या व त्यांनी मान्य करून इमारत त्वरित खाली करून देतो असे सांगितले.

You May Also Like