जळगाव : MMB वीजमीटर संदर्भात शिवाजीनगर येथील नागरिकांची पालकमंत्री यांच्याकडे केली तक्रार

जळगाव : महावितरणच्या MMB वीजमीटर व गलथान कारभाराबाबत शिवाजीनगर येथील नागरिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर भागामध्ये घरातील वीज मीटर बाहेर काढून खांबावरील डीपीवर लावण्यात येत आहे त्यावेळी घरातील मीटर बाहेर लावताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर काही घरातील कनेक्शन हे संगनमत करून इतर मीटरवर वळते केले होते त्यामुळे नागरिकांना १००००,१२०००, १४००० असे भरमसाठ बिल आले आहे. नागरिकांनी याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता (खडके चाळ सबस्टेशन) श्री हर्षल इंगळे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी जागेवर येऊन MMB डीपी वरील सदर कनेक्शन काढून नागरिकांकडून वीज मीटर च्या नावाखाली १७०००रू घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्यां वाचवण्यासाठी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी त्यांना विरोध केला होता या प्रकरणातुन निघण्यासाठी हर्षल इंगळे यांनी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच आम्हाला महावितरण तर्फे नाहक त्रास दिला जात असून जास्तीचे आलेले विज बिल कमी करून हर्षल इंगळे यांचेवर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी देखील मांगणी यावेळी नागरीकांनी केली आहे.

You May Also Like