झोमॅटो डिलिव्हरी बॉयची खोटी तक्रार आणि हल्ल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल

बंगळुरू : झोमॅटो डिलिव्हरी बॉयने केलेल्या धक्कादायक खुलासानंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण लागल आहे. सोशल मिडियावरून या डिलिव्हरी बॉयला आता मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात आहे. डिलिव्हरी बॉयविरोधात खोटी तक्रार आणि त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सोमवारी रात्री हितेशा चंद्रानीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एखाद्याच्या अपमान करून गुन्हेगारी बळाचा वापर करणे, प्राणघातक हल्ला करणे आणि धमकी देणे असे आरोप हितेशावरकरण्यात आले आहे. या तक्रारीनंतर आता कामराज आणि हितेशा या दोघांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांना दोन्ही बाजूने याचा तपास करावा लागणार आहे.

काय आहे प्रकरण ?? ९ मार्च रोजी बंगळुरुमध्ये एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेवर हल्ला केल्याची घटनासमोर आली होती. ज्या महिलेवर हल्ला झाला त्या महिलेनं सोशल मिडीयावर या घद्लेलेया घटनेची माहिती दिली. यात ती म्हणाली होती की, डिलिव्हरी बॉयने ऑर्डर रद्द केल्याच्या रागातून तिच्यावर हल्ला केल्याचं सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या डिलिव्हरी बॉयला अटक करन त्याची चौकशी कैली. परंतु त्याने सांगितलेल्या माहितीतून वेगळीच बाब समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली या माहितीमुळे सगळेच चक्रावून गेले आहेत.

काय सांगितले डिलिव्हरी बॉयने??
ऑर्डर येण्यास उशीर झाला तरीही डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन त्या महिलेकडे आला. परंतु त्यावेळी ती महिला संतापलेली होती. यातच त्या महिलेनं संतापून डिलिव्हरी बॉयला चपलेनं मारले. मारहाण करताना त्या महिलेच्या हातातील अंगठी तिच्याच नाकाला लागली आणि त्यातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर तिने या घटनेला वेगळा वळण दिले आणि त्यात आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती डिलिव्हरी बॉयने पोलिसांना दिली.

You May Also Like