टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडवर 66 धावांनी शानदार विजय

पुणे : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या  एकदिवसीय सामन्यात 66 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. तसेच भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना बाद केलं. तर कृणाल पंड्याने 1 विकेट घेतली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

You May Also Like