तरूणांन आईच्या मृतदेहासमोरच नवरीच्या गळ्यात घातला हार..सर्व गाव हळहळले!

हैदराबाद : तेलंगानामध्ये एक मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यानंतर तिच्याच मृतदेहासमोर मुलानं नवरीच्या गळ्यात हार घातला. ही घटना संगारेड्डी जिल्ह्यातील ईस्माईल खानपेट येथील आहे.

ईस्माइल खानपेट येथील पल्पानुरी रेणुका यांच्या तीन मुलांपैकी मधला मुलगा राकेशचा साखरपुडा 6 मे रोजी आणि लग्न 21 मे रोजी ठरलं होतं. त्यामुळे अमेरिकेत राहणारा राकेज लग्नासाठी त्याच्या घरी परतला होता. परंतु या काळात आई रेणुका यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करावे लागले.

आपल्या आईची अशी अवस्था पाहून मुलगा राकेशनं साखरपुडा आणि लग्न स्थगित केले. आई लवकरच बरी होऊन घरी परतेल या आशेवर घरातील सगळी मंडळी बसली होती. त्याचवेळी रेणुका यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेणुका यांच्या जाण्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. परंतु मुलाच्या लग्नासाठी आईनं खूप वाट पाहिली होती. त्यामुळे राकेशनं आईच्या मृतदेहासमोरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दु:खात असलेले नवरा-नवरी दोघांनी आई रेणुकाच्या मृतदेहासमोरच एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्नाचे विधी पार पाडले.

 

You May Also Like

error: Content is protected !!