ताडोबावर करोनाच संकट; विना मास्क प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर होणार कडक कारवाई

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचे करोनासंदर्भातील नियम आता अधिक कटाक्षाने पाळले जाणार आहेत. सध्या दिवसेंदिवस महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर ताडोबा व्यवस्थापनाने काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.

त्यानुसार आता मास्क शिवाय ताडोबात प्रवेश करणाऱ्या पर्यटकाला तब्ब्ल १ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ताडोबात सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनाच पालन करून पर्यटन सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता पर्यटकांसाठी काही कडक नियम लागू करण्यात आले आहे.

यामध्ये ताडोबातील जिप्सीच्या वेळा विभागून पर्यटकांची गर्दी टाळण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रचलित वेळेच्या अर्धा तास आधीच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असून, त्यांना अर्धा तास आधी परतावे लागणार आहे. ज्या सफारी वाहनात सहा पर्यटक असतील, अशा वाहनांना ठराविक वेळेच्या अर्धा तास आधीही ताडोबात पर्यटनासाठी प्रवेश करता येणार आहे.

तसेच विना मास्क कुणालाही प्रवेश दिला जाणार नसून, सर्व पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग प्रवेशद्वारावरच करण्यात येईल. अशी माहिती मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

You May Also Like

error: Content is protected !!