तौक्ते चक्रीवादळ : वांद्रे-वरळी सीलिंक बंद, वादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी काय काळजी घ्यावी?

तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असल्याचे भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गुजरात आणि दीव किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे. या वादळाच्या प्रभावामुळे रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये वेगवान वारे वाहत आहेत.
परिणामी वांद्रे-वरळी सीलिंक पुढची सूचना मिळेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

You May Also Like