दिलासादायक! रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५. ६ टक्क्यांवर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट असताना दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.6 टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या 24 तासात 4 लाख 22 हजार 436 रुग्णांनी करोनावर मात केली. पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलीयं.

देशातील आठ राज्यांमध्ये 1 लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर 18 राज्यांमध्ये 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण सक्रीय आहेत. दिल्ली, यूपी आणि गुजरातमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. 13 राज्यांमध्ये करोना संक्रमण दर हा 5 ते 15 टक्के इतका आहे. देशात करोना रुग्ण कमी होत असले तरी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातायं.

देशात मागच्या 24 तासात 2 लाख 63 हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. 7 मे रोजी हाच आकडा 4 लाख 14 हजार इतका होता. त्या तुलनेत रुग्ण संख्येत 27 टक्क्यांनी घट झाली आहे. देशात मंगळवारी रुग्णवाढीचा दर 14.10 टक्के इतका आहे. देशात आतापर्यंत 1.8 टक्के लोकांनाच करोनाची लागण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

You May Also Like