देशात ३१ मार्चपासून रेल्वे सेवा होणार बंद? रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यात पुन्हा कड निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना उद्रेकामुळे ३१ मार्च २०२१ पासून देशातील रेल्वे सेवा बंद होणार असल्याचे वृत्त सोशल मिडियावर झपाट्याने पसरत आहे. हे वृत्त खोटे असून असा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती भारतीय रेल्वे प्रशासनाने दिली आहे. केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्रालयातंर्गत येणाऱ्या एजेंसी इंफॉरमेशन ब्युरो नेही ३१ मार्च २०२१ पासून देशात रेल्वे बंद होणार असल्याच्या वृत्त जुने असून त्यात खोडसाळपणा करत पुन्हा व्हायरल केले जात असल्याचे सांगितले आहे. देशात कोरोना रुग्ण वाढल्या असल्याने देश पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर ३१ मार्चपासून रेल्वेगाड्या बंद होणार असल्याच्या अफवा पसरु लागल्या. या अफवांचे खंडन करत पीआयबीने ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंडवरुन रेल्वे ३१ मार्चपासून बंद होणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे देशातअद्याप तरी रेल्वे बंद करण्यासंदर्भातील निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला नाही.

You May Also Like