धक्कादायक लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
दिपाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा दबाव व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती कळतेय. त्यात काय लिहलंय हे अद्याप कळू शकले नाही.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,दिपाली चव्हाण यांना उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे.

You May Also Like