धनकवडी परिसरात अज्ञातांनी दुचाकी जाळल्या; CCTVच्या आधारे तपास सुरू

पुणे – धनकवडी गावठाण, दत्तमंदिर समोर अज्ञानातांनी दोन दुचाकी जाळल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली, दुचाकी जळण्याचा आवाजाने जाग्या झालेल्या नागरिकांनी बाहेर येईपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सहकारनगर पोलीस सकाळी घटनास्थळी येऊन पाहणी केली, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरासह उपनगरांमध्ये गाड्या जाळण्याचे प्रकार वारंवार घडत असून हे लोण आता मध्यवर्ती ठिकाणी येऊन ठेपले आहे. धनकवडी गावठाण मध्ये दाट लोकवस्ती असलेल्या गल्लीत संदीप आनंदा दरेकर व राम मोहन कटके यांच्या गाड्या जळाल्या.

दरम्यान आमदार भिमराव तापकीर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तापकीर म्हणाले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेचा ताबडतोब तपास करून आरोपींना कडक शिक्षा केली पाहिजे. गल्ली बोळातून सुद्धा पेट्रोलिंग करण्याची आवश्यकता आहे

You May Also Like