धुळ्यात १७ मार्चपर्यंत लॉकडाऊन , मार्केट परिसरात छूकछूकाट

धुळे जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहरात १४ मार्च सायंकाळी ६ वाजेपासून ते १७ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहील. महानगरवासीयांनी स्वतः च्या जीवाची काळजी करावी, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे तसेच जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित , मनपा आयुक्त अजीज शेख आदींनी केले आहे.

You May Also Like

error: Content is protected !!