नवी दिल्ली : आपलेही झाले परके! कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ओळखण्यास दिला नकार मग…

नवी दिल्ली – देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांचा आकडा दोन कोटींवर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ओळखण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.

बिहारच्या जगदीशपूरमध्ये ही घटना घडली आहे. ममता देवी असं या 50 वर्षीय महिलेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. मात्र त्यांच्या नातेवाईकांनी यानंतर पाठ फिरवली. मृतदेह ओळखण्यास देखील नकार दिला. यामुळेच प्रशासनावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. महिलेच्या मृत्यूची तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट आपला संबंधच नसल्याचं सांगितलं.

You May Also Like