नवी दिल्ली : May 10,2021 CoronaVirus : थोडासा दिलासा; गेल्या २४ तासांत ३,६६,१६१ कोरोनाचे नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ६६ हजार १६१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३७५४ जणांचा मृत्यू झाला. तसेच, ३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा आकडा इतर दिवसाच्या तुलनेत कमी असल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली असून, त्यातील १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख ४६ हजार ११६ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३७ लाख ४५ हजार २३७ इतकी आहे.

You May Also Like