नुकसान झालेल्या शेताची खासदार रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी

माणेगाव येथील शेत शिवारातील मका उध्वस्त झाल्याची बातमी जळगाव परिवर्तन न्युजवर झळकताच याची माहिती मिळताच खा.रक्षाताई खडसे तसेच तहसिलदार श्वेता संचेती यांनी शेतावर जात पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली याबाबत सविस्तर वृत्त असे की
परवा आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कोथळी येथील एक घर कोसळले होते तर कोथळी येथील शेतकरी भानुदास चौधरी, ओंकार चौधरी, चंद्रकांत चौधरी यांचे माणेगाव शेतशिवारातील शेतातील मका पूर्णपणे उध्वस्त झाला असल्याची बातमी सर्वात आधी जळगाव परिवर्तन न्युजवर प्रसिद्ध झाली होती. ही बातमी खासदार रक्षाताई खडसे यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह तहसीलदार श्वेता संचेती,तलाठी धनराजी मुंडे ,कोथळी पोलिस पाटील श्री संजय चौधरी ,ग्राम पंचायत सदस्य उमेश राणे ,ग्राम पंचायत सदस्या सौ.मिराकाकू पाटील ,प्रा.विजय चौधरी ,योगेश चौधरी , सर ,मुक्ताई रुग्णवाहीकेचे योगेश पाटील ,तुषार राणे सरपंच सालबर्डी , यांनी नुकसान झालेल्या शेताची पाहणी करीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतात विज पुरवठा करणारी उघडी डि.पी.चे
नुतणीकरण करून मिळावे नाहीतर दुर्घटना होण्यास वेळ लागणार नाही अशी मागणी श्री ज्ञानेश्वर चौधरी ,श्री विकास चौधरी सर यांनी केली.
यावर कृषी ,विज मंडळ ,घराची झालेली पडझड यासर्व बाबी लक्षात घेऊन अडचणी लवकरच दुर होतील अशी माहीती खा.रक्षाताई खडसे यांनी शेतकरी बांधवाना दिली. तसेच कोथळी येथील नुकसानग्रस्त पाटील कुटुंबियांना रोख रक्कम देवून सात्वन केले त्यासोबत गावचे ग्राम पंचायत सदस्य उमेश राणे यांनी शुध्दा त्या परिवारास वैयक्तिक आर्थिक मदत करून आधार दिला.

You May Also Like