पिवळी बुरशी: भारतात रुग्ण आढळल्याने चिंतेत वाढ

नवी दिल्ली : करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला आहे. त्यातच ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड्स मिळवण्यासाठी नातेवाईकांना कसरत करावी लागतेयं. त्यातच काळ्या व पांढर्‍या बुरशीच्या रोगाशी सामना करताना आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण देशात सापडला आहे आणि तो अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांकडुन सांगण्यात येतंय.

देशात मागील 24 तासांत 2 लाख 22,315 नव्या रुग्णांची भर पडली, तर 3 लाख 2,544 रुग्ण ब रे झाले. 4454 रुग्णांना मागील 24 तासांत प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 2 कोटी 67 लाख 52,447 कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 2 कोटी, 37 लाख 28,011 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 3 लाख 3720 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत 19 कोटी 60 लाख 51,962 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिलीयं.

काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद येथे पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळला आणि ही बुरशी अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. पिवळ्या बुरशीमधे भूक कमी लागणे किंवा लागणेच नाही, वजन कमी होणे, सुस्तपणा, पू ची गळती, जखमेवर हळूहळू उपचार होणे, कुपोषण, अवयव निकामी होणे, डोळे येणे असे विविध लक्षणं दिसुन येत आहेतं. तर पिवळी बुरशी होण्यामागचं कारण अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शिळं अन्न खाऊ नये. घरातील दमटपणाही महत्त्वाचा ठरतो.

You May Also Like