पुणे -: चाकण पोलिसांची कारवाई- पाच लाखांचा गुटखा जप्त

पुण्यात चाकण पोलीस अवैध गुटखा विक्रेत्यांवर सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दी बाहेरुन गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यासोबतच टेम्पो ही जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत तब्बल 5 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा आणि साडे तीन लाखाचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल चाकण पोलिसांनी जप्त केला आहे.चाकणमधील नाणेकरवाडी येथे एका पान टपरीवर कारवाई करुन पोलिसांनी 8 हजार 850 रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या कारवाईत गुटखा विक्रेता आरोपी नीरज बन्सल याला ताब्यात घेऊन गुटख्याच्या पुरवठादार याबाबत चौकशी केली होती. तेव्हा आरोपी अंकुर गुप्ता यांच्याकडून गुटखा आणल्याचे आरोपी बंसल यांनी सांगितले. त्यानुसार शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथून पोलिसांनी मोकळ्या जागेतून आरोपी गुप्ता यांचा तीन चाकी टेम्पोसह गुटखा जप्त केला आहे.
नीरज बंसल याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तर, मुख्य आरोपी अंकुर गुप्ता सध्या फरार आहे.

You May Also Like