पुणे जिल्हा: मुळशी तालुक्‍यात पाच हॉटेलवर पोलिसांची कडक कारवाई

पिरंगुट -मुळशी तालुक्‍यात वेळेपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या पाच हॉटेलवर पौड पोलिसांनी कारवाई केली आहे, तसेच विनामास्क फिरणाऱ्या 150 जणांवर कारवाई करत 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.

जिल्ह्यातही करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. परिणामी सरकारने काही निर्बंध घालून दिले आहेत. सरकारने घालून दिलेले नियम अनेक जणांकडून पायदळी तुडविले जात आहेत. यावर पौड पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

पिरंगुट आणि भूगाव परिसरातील 5 हॉटेलावर कारवाई करण्यात आली आहे.150 जणांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस नाईक जय पवार, पोलीस हवालदार तुषार भोईटे, गणेश सांळुके आदींनी कारवाई
केली आहे.

सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार रात्री दहा ते सकाळी सहा यावेळेत संचारबदी आहे. दुकानदारांनी आपली दुकाने निर्धारित वेळेत बंद करावीत. वेळेत दुकाने बंद न करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही कारवाई सुरू राहणार आहे. दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने सील केली जातील.

You May Also Like