बुलडाणा : “सर्वसाधारण पाऊस आणि रोगराईचे संकट यंदाही कायम”; भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

बुलडाणा : अखेर आज प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेले होते. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असे भाकित करण्यात आले आहे.

जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होईल. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

यंदा कापूस, ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे. तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव मिळणार नाही. यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार आहे. कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे. देशात घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील. पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल.

देशाच्या राजाची गादी कायम राहणार आहे मात्र राजाला अनेक अडचणींचा तणावाचा सामना करावा लागेल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

You May Also Like