बोदवड : प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त वंचीततर्फे बोदवड येथील कोविड सेंटरमध्ये फळ वाटप

बोदवड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त बोदवड येथील कोविड सेंटर येथे वंचीत बहुजन आघाडीच्या तालुका पदाधिकारी यांनी रुग्णांना फळ वाटप करून बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तालुकाध्यक्ष सुपडाभाऊ निकम, जिल्हा संघटक सलीमभाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरळकर, शहराध्यक्ष अण्णा रेणुके, शहर संघटक अनिल गायकवाड, तालुका सचिव नितीन सपकाळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रमिला बोदडे, तालुका उपाध्यक्ष प्रज्ञा संतोष सुरळकर, तालुका संघटक सुवर्णा भीमराव सुरळकर, शाखा अध्यक्ष वैशाली सपकाळे, शाखा अध्यक्ष भीमराव सुरळकर, शाखा अध्यक्ष संतोष सुरळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

You May Also Like