‘भाजपचे काही कार्यकर्ते प्रशासनात तर काही राजभवानात’

मुंबई – भाजपचे शिष्टमंडळांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतरही ठाकरे सरकार विरोधकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, भाजपचे काही कार्यकर्ते प्रशासनात आहेत, तर काही राजभवानात आहेत. त्यामुळे त्यांना भेटू द्या. ती त्यांच्या घरातली गोष्ट आहे. राज्यपाल हे देखील कालपर्यंत संघाचे प्रचारक होते, भाजपचे मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते. मग कार्यकर्ता बोलणं हा अपमान आहे का? असा खोचक प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.

विरोधकांनी राज्यपाल यांना भेटण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटा. राज्यपाल सरकार चालवतात की मुख्यमंत्री? राजभवन हा राजकीय अड्डा झाला असेल तर राजकीय टीका होणारच. जो पर्यंत राज्यपाल १२ आमदारांना मंजूरी देत नाही तोपर्यंत आम्ही हे म्हणत राहणार. राज्यपाल भाजपच्या दबावामुळे १२ आमादारांच्या नावांना मंजूरी देत नाही आहेत. नाही तर असे काय आहे त्या फाईलींमध्ये? असे प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसंच गेल्या काही दिवसांतील घटनांसंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा आणि तो राष्ट्रपतींना पाठवावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. भाजपच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.

You May Also Like

error: Content is protected !!